जवळील प्रेक्षणीय स्थळे


हनुमंताची आई श्री अंजनी माता यांनी हनुमंताच्या जन्माच्या आधी तपश्चर्या केली होती तेच हे ठिकाण. येथे हनुमानाचे खूप सुंदर असे पर्वतांनी वेढलेले मंदिर आहे . मंदिराच्या समोर शुद्ध पाण्याचा तलाव आहे आणि तेथूनच पुढे अंजनी मातेचे तपश्चर्या केलेले ठिकाण आहे . भीमाशंकर पासून अंदाजे २ किमी अंतरा वर हे स्थान आहे .