त्रेतायुगा मध्ये त्रिपुरासुर नावाचा दैत्य होता .त्याने भगवान शंकराची आराधना करून त्याने त्याच्या अमरात्वाचे वरदान शंकराला मागितले . भगवान शंकरांने त्याला वर दिला कि तुझा कोणताही नर अथवा नारी वध करू शकनार नाही. शंकराच्या वरदाना मुळे तो तिन्ही लोकात ( पृथ्वी , स्वर्ग ,पाताळ ) उन्मत्त होऊन देवगणा सहित मानव जातीला त्रास देऊ लागला. असे बराच काळ चालले. देवगणा सहित सगळे, भगवान शंकरांना शरण आले . भगवान शंकर क्रोधीत झाले आणि त्रिपुरासुराचा संहार करण्याचा निश्चय केला.या साठी रथ तयार करण्यात आला 4 वेदांचे प्रतिक म्हणून चार खांब , चंद्र , सूर्य यांची चाके , शेष नागाचा धनुष्य , आणि बाणावर विष्णू असा हा रथ घेऊन भगवान शंकर कार्तिक प्रतिपदेच्या दिवशी पृथ्वीतलावर अवतरीत झाले . याचे विश्लेषण खालील श्लोकात केले आहे.
|| रथः क्षोणी यन्ता शतधृतिरगेन्द्रो धनुरथो । रथाङ्गे चन्द्रार्कौ रथ-चरण-पाणिः शर इति ।
दिधक्षोस्ते कोऽयं त्रिपुरतृणमाडम्बर विधिः विधेयैः क्रीडन्त्यो न खलु परतन्त्राः प्रभुधियः ||
ब्रम्हा , विष्णू , महेश , यांनी मिळून पंचतत्त्व ( जल , वायू ,आकाश ,पाताळ ,पृथ्वी ) एकत्र करून श्री आदिमाया आदिशक्ती पार्वती यांची कमल पुष्पांनी आराधना केली. कमल पुष्पातून पार्वती चे आवाहन करण्यात आले . हे पार्वतीचे वास्तव्य आजही भीमाशंकर क्षेत्रात आहे . या आदिशक्तीस "कमलजा माता" या नावाने ओळखळे जाते. भगवान शंकर आणि आदिमाया पार्वती यांनी एकत्रित होऊन अर्धनारी रूप धारण केले . असे अर्धनारी रूप धारण करून भीमरूपात (महाकाय रूप) त्रिपुरासुराचा वध कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी केला.
हे युद्ध कार्तिक शुद्ध प्रतिपदा ते कार्तिक शुद्ध पोर्णिमा असे होऊन कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरासुराचा वध झाला. देवांना परिश्रम झाले असल्याने विश्रांती साठी ते बसले असता देवाच्या शरीरातून प्रचंड अश्या स्वरूपात घामाच्या धारा निघायला लागल्या होत्या तेथूनच भीमा नदी चा उगम झाला तो आजही प्रवाहित आहे. त्या वेळेस देवगणानी भगवान शंकरांना विनंती केली आपण सर्व , मानव जातीच्या कल्याण साठी येथेच विराजमान व्हावे. हि विनंती मान्य करत भगवान शंकरानी स्वयंभू शिवलिंगाच्या रूपात तेथे निवास केला .त्रिपुरा सुराचा वध झाल्यानंतर त्याच्या दोन भार्या शाकिनी व डाकिनी देवांना शरण आल्या. शंकरानी त्यांना वरदान दिले माझ्या नावाच्या आधी तुमचे नाव लागेन . म्हणून "डाकिण्याम भीमशंकरम " असे श्लोकात वर्णन आहे . ज्योतिर्लिंग म्हणजेच ज्योती स्वरूप स्वयं शिव जेथे आजही भगवान शंकर विराजमान आहेत . कार्तिक पौर्णिमा या दिवशी त्रिपुरासुराचा वध झाल्याने आजही भव्य दिव्य असा उत्सव साजरा केला जातो .
|| यं डाकिनी शाकिनी का समाजे निषेव्य माण पिशीता शनेश्च |
सदैव भिमादि पद प्रसिद्धम् तम शंकरम भक्ती हितं नमामि ||